Three Angel's Message :
देवाने पवित्रशास्त्रामध्ये विशिष्ट काळासाठी विशेष संदेश दिले आहेत. त्या काळाची ती गरज होती. तो संदेश त्या पिढ्यांसाठी फार महत्वाचा होता. परमेश्वराने नोहाला संदेश दिला. संदेष्टा एलिया यांस परमेश्वराने संदेश दिला तसेच बाप्तिस्मा करणारा योहान यालापण विशिष्ट संदेश दिला. शेवटच्या काळासाठी सनातन सुवार्तेचे संदेश देवाने तीन देवदूतांच्या द्वारे आपणास दिला आहे. परंतु हा संदेश सांगण्याचे कार्य देवाने देवदूतांना नव्हे तर मनुष्याला सांगण्याचे सोपवले आहे. ( प्रे:क्र- ८:२५ ) ( प्रे:क्र- १०:१ ते ६ )
परमेश्वराने जे तारणाचे कार्य या पृथ्वीवर सुरु केले आहे त्या मध्ये देवदूताचा महत्वाचा सहभाग आहे. मनुष्याच्या तारणाच्या कार्यामध्ये त्यांना आस्था आहे. ( इब्री- १:१० )
* Free Book Download Link: Click here 👈
* The Greatest Prophecy in the Bible: Click here 👈