लोकांना चेतविण्याचे सामर्थ्य इतके महान असेल की १८४४ ची चळवळ पुन्हा एकदा उफाळून वर येईल. तिसऱ्या देवदूताचा संदेश पुढे चालू राहील. तो हळुवार नसेल परंतु मोठ्या आवाजात असेल. -टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:२५२ (१८५५). मी पाहिले की हा संदेश मोठ्या सामर्थ्याने आणि मोठ्या आवाजाने बंद होईल. -अर्ली रायटिंग २७८ (१८५८).
पेंटिकॉस्टच्या दिवसासारखा
अगदी उत्सुकतेने आणि मना पासून मी पेंटिकॉस्टच्या घटने कडे पाहिले. पेंटिकॉस्टच्या घटने पेक्षा मोठ्या सामर्थ्याने घडेल योहान म्हणतो "मी पाहिले की दुसरा एक देवदूत स्वर्गातून उतरताना मी पाहिला. त्याच्या कडे मोठी शक्ति होती. त्याच्या प्रकाशाने सर्व पृथ्वी प्रकाशित झाली". असे त्याचे गौरव होते. (प्रकटीकरण १८:१ ) त्या पेंटिकॉस्टच्या वेळी लोक सत्य ऐकतील. तेही प्रत्येकजण आपापल्या भाषेत ऐकत होते. -द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ६:१०५५ (१८८६).
रात्रीच्या दृष्टांतामध्ये देवाच्या लोकांमध्ये महान सुधारणा होत असल्याचे दृश्य माझ्या पुढून गेले. अनेक जण देवाचे गौरव करीत होते. आजारी लोक बरे झाले आणि इतर बरेच चमत्कार घडले. आत्मा मध्यस्थी करीत असलेला दिसून आला. पेंटिकॉस्टच्या महान दिवशीही त्याचे कार्य होते. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:१२६ (१९०९).
शुभवृत्त प्रसाराच्या थोर कार्याच्या सुरवातीला देवाच्या सामर्थ्याचे जसे ठळक प्रकटीकरण झाले होते त्या हुन ते त्याच कार्याचा शेवट होताना कमी प्रमाणात केले जाणार नाही. शुभवृत्त प्रसाराच्या सुरवातीला पवित्र आत्म्याच्या वर्षावासंबंधी जी कोणती भविष्ये पूर्ण झाली होती. त्या भविष्याची पुन्हा एकदा पूर्तता या कार्याच्या शेवटच्या काळात वळीव वर्षावाद्वारे होणार आहे.
देवाच्या सेवकांचे चेहरे संपूर्ण समर्पण केल्याच्या पावित्र्याचे उजळलेली तेजपुंज असतील. ते स्वर्गीय संदेश लगबगीने ठिकठिकाणी जाऊन जाहीर करतील. सबंध पृथ्वीवर हजारो आवाजाद्वारे इशारे दिले जातील. चमत्कार केले जातील. आजाऱ्यांना बरे केले जाईल व विश्वासणाऱ्यांकडून अद्भुते व चिन्हे केले जातील. -द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६११, ६१२ (१९११).