जस जसा शेवट जवळ येईल तसे देवाचे लोक साक्ष्य देण्यासाठी अधिक धैर्यवान होतील. -सेलेक्टड मेसेजस ३:४०७ (१८९२).
(प्रकटीकरण १४:९-१२) या संदेशामध्ये प्रामुख्याने दोन मुख्य गोष्टी आहेत. मोठ्या आरोळीचे प्रतिनिधित्व केले आहे, आणि हे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आहे. -द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९८० (१९००).
तिसऱ्या देवदूताचा संदेश जसा मोठ्या आरोळीमध्ये वाढत जाईल तसे महान सामर्थ्य आणि गौरवाचा यामध्ये समावेश असेल. देवाच्या लोकांचे चेहरे स्वर्गीय सामर्थ्याने चमकतील. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:१७ (१९०२)
पृथ्वीच्या मध्यभागी शेवटच्या महान संकट समयी देवाचा प्रकाश तेजस्वी होईल आणि आशेचे आणि विश्वासाच्या गीताचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. -एजुकेशन १६६ (१९०३).
प्रकटीकरणाचा १८व्या अध्यायात सांगितल्या प्रमाणे तिसऱ्या देवदूताचा संदेश मोठ्या सामर्थ्याने श्वापद आणि त्याच्या मूर्तीचा शेवटचा इशारा जगाला देण्यात येईल. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ८:११८ (१९०४).