
अनेकांनी मला लिहिले आहे. त्यांनी चौकशी केली आहे की विश्वासाने नीतिमत्व हा तिसऱ्या देवदूताचा संदेश आहे काय? आणि मी उत्तर दिले, तो तिसऱ्या देवदूताचा संदेश आहे हे सत्य आहे. -सेलेक्टड मेसेजस १:३७२ (१८९०).
देवाने आपला महान कृपेने आणि दयेने अति मौल्यवान संदेश त्याच्या लोकांना वडील इ. जे वॅगनर ए. टी. जोन्स यांच्या कडून दिले आहेत. हा संदेश लोकांसमोर अति ठळकपणे आणायचा होता. याच बरोबर तारणार आणि त्याचे बलिदान जगाचे पाप हरण करण्यासाठी त्याचे समर्पण स्पष्ट करायचे होते. तसेच विश्वासाने नीतीमत्वाची खात्री यातून लोकांना ख्रिस्ताची धार्मिकता मिळविण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. ज्यामुळे देवाच्या आज्ञाचे पालन करून ही धार्मिकता मिळवायची हे स्पष्ट करण्यात आले. अनेकांनी येशूला पाहण्याचा दीर्घ द्रीष्टीकोन हरविला. त्या पवित्र व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांना तशा प्रकारच्या डोळ्यांची गरज आहे. त्याचे गुण आणि न बदलणारे प्रेम हे मानवासाठी आहे. सर्व सामान्य त्याच्या हाती आहे. म्हणजे तो मनुष्याला मोलवान देणगी देऊ शकेल. अगतिक मानवाला तो आपल्या धार्मिकतेची मौल्यवान देणगी देऊ शकतो. हा संदेश जगाला देण्याची देवाने आज्ञा केली. हा संदेश तिसऱ्या देवदूताने मोठ्या आरोळीसहीत घोषित करायचा आहे. आणि त्याच बरोबर पवित्र आत्म्याचा वर्षाव मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे. -टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ९१ (१८९५).
ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा संदेश पृथ्वीच्या या टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत देवाचा मार्ग तयार करण्यासाठी द्यायचा आहे. तिसऱ्या देवदूताचे कार्य संपविणे हे देवाचे गौरव आहे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१९ (१९००).
देवाच्या दयेचा संदेश जगाला जो दिला आहे हे त्या प्रीतीयुक्त स्वभावाचे प्रकटीकरण आहे. देवाची मुले त्याचे गौरव त्यांच्या जीवनात प्रगट करतात आणि आपल्या कृतीतून देवाच्या दयेचे प्रदर्शन करतात. -ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ४१५, ४१६ (१९००).