
प्रकटीकरण १४ मध्ये देवाने संदेश दिला आहे. भविष्याची पूर्तता होत आहे. परंतु त्याचे कार्य अजून संपले नाही आणि जगाचा इतिहासाच्या शेवटपर्यंत काम चालूच राहिल. -इजी. डब्ल्यू ८८८०४ (१८९०).
प्रकटीकरण १८ हा अध्याय त्यावेळेकडे निर्देश करतो की प्रकटीकरण १४:६-१२ चा तिहेरी इशारा अव्हेरल्याचा परिणाम म्हणून ख्रिस्ती धर्म पंथ दुसर्या देवदूताने पूर्वसूचित केलेल्या अवस्थेत आढळतील. मग बाबेलमध्ये देवाचे जे लोक अजून ही असतील त्यांनी बाबेलशी सर्व संबंध तोडून विभक्त व्हावे असे त्यांना पाचारण करण्यात येईल. जगाला दिला जाईल असा हा अगदी शेवटचा संदेश असेल. -द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी ३९० (१९११).
प्रकटीकरण १८:१, २, ४ हा शास्त्रलेख काळातील त्या वेळेकडे निर्देश करतो जेव्हा बाबेलच्या पतनाची घोषणा जी प्रकटीकरण्याच्या वचन ८ दुसर्या देवदूताने केली होती ती पुन्हा केली जाणार आहे. हा संदेश पहिल्यांदा १८४४ च्या उन्हाळ्यात दिला होता.
बाबेलची पातके उघड केली जातील. मंडळींचा रिवाज शासना करवी कायद्याने सक्तीचा केल्याचे भयंकर परिणाम, पिशाच्च वादाचे वाढते प्रभावी, क्षेत्र, पोपसत्तेची चोर पाउलांनी परंतु वेगाने प्रगती, सर्वकाही उघड केले जाईल. या गंभीर इशार्याने लोकांमध्ये खळबळ माजेल. ज्यांनी असले संदेश पूर्वी ऐकले नव्हते असे हजारोंचे हजारो लोक ऐकतील. -द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी ६०३,६०४, ६०६ (१९११).