
सर्व मंडळ्यांमध्ये देवाची रत्ने आहेत आणि धार्मिक जगातील सरसकट लोकांना दोष देणे आपले काम नाही. -द ए एस डी बायबल कॉमेंटरी ४:११८४ (१८८५).
प्रत्येक मंडळीमध्ये देवाचे प्रतिनिधी आहेत. या लोकांकडे शेवटच्या दिवसामध्ये काही खास सत्य नसणार. परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये पालट होऊन त्यांच्या हृदयात खात्री होते. त्यांचे देवाशी संबंध असतात म्हणून त्यांच्याकडे आलेला प्रकाशाचे ते नकार करीत नाहीत. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१७, ७१ (१९००).
कॅथलिकमध्ये सुद्धा अनेक जण असे असतील की त्यांचा देवाशी जवळचा संबंध असून ते एकनिष्ठ असतील. त्यांच्याकडे जो प्रकाश आहे त्यामध्ये ते चालत असतात. आणि देव त्यांच्या वतीने कार्य करील. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२४३ (१९०९).
प्रकटीकरणाच्या १८वा अध्याय मध्ये देवाने आपल्या लोकांना बाबेलमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. या वचनानुसार देवाचे अनेक लोक बाबेलमध्ये असतील. आता या सध्याच्या काळात ख्रिस्ताचे बहुतेक अनुयायी कोणत्या धर्मपंथात आढळतील बरे? अर्थात प्रोटेस्टंट धर्मश्रद्धा मानणाऱ्या विविध पंथामध्ये. -द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ३८३ (१९११).
जे ख्रिस्ती पंथ "बाबेल" झालेले आहेत त्यांच्यामध्ये घोर आध्यात्मिक अंधार असून ते देवापासून अलिप्त आढळून येतात तरी ख्रिस्ताचे बहुतेक खरे अनुयायी अजूनही याच मंडळ्यामध्ये आहेत. -द ग्रेट कॉन्टरवर्सी ३९० (१९११).
बाबेलचे पतन अजून संपले नाही

"तिने आपल्या जार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे." (प्रकटीकरण १४ :६- ८). हे कसे केले? लोकांना जबरदस्तीने खोटा शब्बाथ पालन करायला लावले. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:९४ (१९०४).
तरीही त्यांच्याविषयी अजूनही म्हणता येत नाही की तिने आपल्या जार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे. बाबेलने सर्व राष्ट्रांना अजून तसे करायला लावले नाही.
जोवर अशी परिस्थिती आढळून येत नाही, संपूर्ण ख्रिस्ती जगात मंडळ्यांची व जगाची एक मेकांशी पूर्ण युती होत नाही. तो पर्यंत बाबेलचे पूर्णपणे पतन झाले असे म्हणता येत नाही. हा बदल क्रमाक्रमा ने घडून प्रकटीकरण १४:८ अजून भविष्यकाळात पूर्ण व्हायची आहे. -द ग्रेट कॉन्टरवर्सी ३८९, ३९० (१९११).
तिच्या पापाची रास स्वर्गापर्यंत कधी पोहोचली आहे (प्रकटी १८:२-५) जेव्हा शेवटी देवाचे नियम कायद्याने निरर्थक केले आहेत. -द सायन्स ऑफ द टाइम्स, १२ जुन १८९३.