
जेव्हा मंडळ्या कार्य करण्यासाठी तत्पर होतील तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्या विश्वासू प्रार्थनेचे उत्तर देईल. त्यांची विनंती मान्य करील आणि स्वर्गाच्या खिडक्या उघडून त्यांच्यावर वळीव पावसाचा वर्षाव होईल. -रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड. २५ फेब्रुवारी १८९०.
देवाच्या पवित्र आत्म्याच्या वर्षावाने व त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी प्रकाशमान होईल. परंतु जो पर्यंत आपण प्रकाशमान होत नाही तोपर्यंत असे घडणार नाही. जोपर्यंत त्यांना देवाबरोबर एकत्र काम करण्याचा अनुभव येत नाही. तो पर्यंत त्यांना ते समजणार नाही. जेव्हा आपण पूर्णपणे देवाच्या पवित्र सेवेसाठी स्वतःला वाहून घेतो. देव परिस्थिती समजून घेईल आणि तो त्यांच्यावर वळीव वर्षाव करील. परंतु हे मोठ्या प्रमाणात होणार नाही. कारण अजून मोठ्या प्रमाणात मंडळ्या देवाबरोबर एकत्र काम करीत नाहीत. -ख्रिश्चन सर्व्हिस २५३ (१८९६).
मंडळीतून निंदा-नालस्ती व तुच्छता तसे स्वैर स्वभाव व आळस हे सर्व गुण निघून जायला हवे. तरच पवित्र आत्म्याचे कार्य मंडळींमध्ये सुरु होईल. तेव्हा मंडळीला दिसेल की देवाचे दूत मंडळीत आपले कार्य करीत आहेत. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९: ४६ (१९०९).