
आपण वळीव वर्षांची काळजी करण्याची गरज नाही. आपणास एवढेच करायचे आहे की आपले पात्र स्वच्छ ठेवणे आणि त्याचे तोंड वर करून ठेवणे आणि स्वर्गीय पावसाची वाट पाहात प्रार्थना करीत राहा. "माझ्या पात्रामध्ये वळवाचा पाऊस येऊ दे. गौरवी देवदूताचा प्रकाश जो तिसऱ्या देवदूतासोबत होता त्याचा प्रकाश मजवर येऊ दे. मला माझा कार्यभाग दे. सुवार्ता प्रसाराचा आवाज माझ्यामधून निघू दे, येशूबरोबर मला सहकार्य करू दे." देवाचा शोध करीत असता मला तुम्हाला सांगू द्या. तो तुमच्याबरोबर सर्वकाळ कार्य करील. आपली कृपा तो तुम्हाला देईल. -द उपवर्ड लुक २८३ (१८९१).
कदाचित उत्तर वेगाने आणि ताकदीने येईल किंवा कदाचित काही दिवस व आठवडे लागतील. येथे आपल्या विश्वासाची चाचणी असेल परंतु देवाला ठाऊक आहे की आपल्या प्रश्नाचे उत्तर कसे केव्हा द्यायचे. आपल्या कर्तव्याचा भाग म्हणजे आपण परमेश्वराच्या सानिध्यात सतत राहावे. देवाच्या कर्तव्याला तो जवाबदार आहे आणि आपले कर्तव्य तो कधीही चुकविणार नाही. तो विश्वासू आहे. त्याने ते वचन दिले आहे. महत्वाचा आणि महान विषय आहे. यामुळे आपण सर्व मंडळी आपले भेदभाव बाजूला ठेऊन एक हृदय आणि एक मनाने कार्य करू. वैर व स्पर्धा विसरून नम्र होऊ. हे असेच होणार. थांबा आणि वाट पहा. येशू ख्रिस्त आपला प्रतिनिधी आणि मुख्य पुढारी आहे. तो आमच्यासाठी काहीतरी करू पाहात आहे. जे त्याने पेंटिकॉस्ट वेळी केले होते. कारण त्याचे शिष्य प्रार्थना करीत होते. आणि उत्तराची वाट पाहात होते. -द स्पिरिट अँड प्रॉफेसी. ३:२७२ १८७८. पवित्र आत्म्याचा वर्षाव केव्हा होईल याविषयी माझ्याकडे बोलण्यासाठी ठोस माहिती नाही. जेव्हा सामर्थ्यवान देवदूत तिसऱ्या देवदूताबरोबर खाली येईल तेव्हा या जगातील त्यांचे कार्य बंद होईल. माझा संदेश हाच आहे की सर्वकाळ त्याच्यासाठी तयार रहावे. आपले दिवे तेवत ठेवावे. यातच सुक्षितता आहे. -सेलेक्टड मेसेजस १:१९२ (१८९२).