Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वळीव वर्षावाचा मार्ग मोकळा करणे

वळीव वर्षावाचा मार्ग मोकळा करणे

मी पाहिले की कोणीही त्यांचा ताजेतवानेपणा दाखवीत नव्हते कारण त्यांनी आपला स्वार्थ, घमेंड, जगिक आकर्षण आणि प्रत्येक चुकीचे शब्द आणि वागणे यावर विजय मिळविला नव्हता. म्हणून आपण देवाच्या जवळ आणखी जवळ जाणे आवश्यक आहे. आणि देवाला आवडणार्या गोष्टींचे पालन करण्यासाठी कळकळीची प्रार्थना करून वाईटा विरुद्धलढाई करण्यासाठी देवाच्या दिवसांपर्यंत  तटस्थ उभे राहिले पाहिजे. -अर्ली राइटिंग्स ७१ (१८५१). 


आपल्या स्वभावातील वाईटपणा काढण्यासाठी आपल्यालाच उपाय शोधणे आवश्यक आहे. आपले शरीर देवाचे मंदिर आहे. म्हणून आपल्या आत्म्याला दूषित करणाऱ्या सर्व गोष्टी काढून मंदिर स्वच्छ करावे. असे केल्यास आपल्यावर वळीव वर्षाव होईल. आगोटीचा पाऊस हा शिष्यांवर पेन्टिकोस्टच्या दिवशी पडला होता. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२१४ (१८८२). 


देवाच्या लोकांनी आपल्या सर्व वाईट गोष्टी काढून देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी सुरुवात केली तर सैतान घाबरून जाईल असे होणार नाही. परंतु तरीही सर्व प्रकारचे मोह सर्व विरुद्ध गोष्टी उघड किंवा गुप्त या सर्वांमधून अनेक जण यशस्वीपणे बाहेर पडतात. "बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो." (जखर्या ४:६) -सेलेक्टड मेसेजस १:१२४) (१८८७). 


वळीव वर्षावाचा पाऊस येईल आणि प्रत्येक आत्मा देवाच्या आशीर्वादाने भरेल. सर्व भ्रष्टतेपासून देव त्यांना शुद्ध करील. आपले कर्तव्य आहे की आपण आपले आत्मे ख्रिस्ताला शरण जाणे आवश्यक आहे. यामुळे देवाच्या आसनासमोर उभे राहण्यास आपण लायक होऊ. पवित्र आत्म्याच्या बाप्तिसम्यासाठी तयार राहू. -सेलेक्टड मेसेजस १:१९१ (१८९२). 



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : १०