
जेव्हा सेवकांच्या आत्म्यामध्ये ख्रिस्ताचे वास्तव्य असेल, सर्व स्वार्थ मेलेला असेल आणि जेव्हा प्रतिस्पर्धी किंवा वैर् नसेल भांडण किंवा श्रेष्ठत्व नसेल. सर्वांमध्ये ऐक्य असेल. एकमेकांवर प्रीती असेल. स्वतःला शुद्ध करीत असेल तर मग त्यांच्यावर दयेचा पवित्र आत्म्याचा त्यांच्यावर वर्षाव करील. हे देवाचे वचन आहे आणि तसेच घडेल कारण त्याच्या वचनातील एक काना किंवा मात्रा कमी होणार नाही. परंतु जेव्हा इतरांची कामे जर जमेत धरली जाणार नाहीत तर त्यांनी आपल्या कामाचे श्रेष्ठत्व व महत्व कार्याद्वारेच पटवून द्यावे आणि जर कोणी भेदभाव दाखविला तर देव त्यास आशीर्वाद देणार नाहीत. -सेलेक्टड मेसेजस १: १७५ (१८९६).
त्या महान दिवशी जर आपण ख्रिस्ताच्या आश्रयाला त्याच्या उंच छत्राखाली सुरक्षित उभे राहिलो तर आपण सर्वानी एकमेकातील फरक वैरभाव आणि श्रेष्ठत्व बाजूला ठेवणे आवश्यक आहे. सर्व अपवित्र निखाल्स काढून टाकाव्या त्यांचा नाश करावा, मुळा पासून उखडून काढावे. म्हणजे पुन्हा जीवनात कधीच वर येणार नाहीत. देवाच्या बाजूने आपण स्वतःला परिपूर्ण करावे. -धिस डे विथ गॉड २५८ (१९०३).
सर्व ख्रिस्ती लोकांनी आपल्यामधील भेदभाव बाजूला ठेवावा. आणि त्यांनी स्वतःस देवाला इतर आत्मे राज्यात आणण्यासाठी समर्पण करावे. विश्वासाने आशीर्वाद मागावा म्हणजे तो मिळेल. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:२१ (१९०४).