Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

खर्या पश्चातापामध्ये आपण आपली हृदये नम्र करावीत

Confess the sin and ask for forgiveness

आपल्यामध्ये खऱ्या ईश्वरनिष्टेचे पुनरुज्जीवन होणे अति आवश्यक आणि तातडीची गरज आहे. हे अति महत्वाचे आहे त्याचा शोध घेणे हे आपले पहिले काम आहे. देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण कळकळीची व काकुळतीची प्रार्थना करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा होत नाही की देव आपल्याला आशीर्वाद देण्यास तयार नाही. त्याची नेहमी तयारी असते परंतु तो मिळविण्याची आपलीच तयारी नसते. आपल्या स्वर्गीय पित्याची खूप इच्छा आहे की आपल्याला पवित्र आत्मा मिळावा. जे लोक पवित्र आत्मा मागतात त्यांना तो ताबडतोब देण्यास तयार असतो. आपला जगिक बाप ज्या देणग्या आपणास देतो त्या पेक्षा कितीतरी मौल्यवान देणग्या तो स्वर्गीय बाप देऊ शकतो. परंतु आपले कर्तव्य आहे की आपण नम्र पणे पश्चातापी अंतःकरणाने त्याच्या कडे पश्चाताप करावा. पापाची कबुली द्यावी. व क्षमायाचना करावी. कळकळीची प्रार्थना करून आशीर्वाद मिळवावा. पुनरुज्जीवन मिळविण्यासाठी प्रार्थनेची अति आश्यकता आहे. म्हणजे देव आशीर्वाद देण्याचे त्याचे अभिवचन पूर्ण करील. -सेलेक्टड मेसेज १:१२१ (१८८७)


आपल्यामध्ये सर्वस्वी पुनरुज्जीवन झालेले असतील. परिवर्तन होण्यासारखे आपले कार्य असावे. पाप कबुली पश्चाताप आणि परिवर्तनाची गरज आहे. जे देवाचे वचन शिकवतात त्यांच्या हृदयात येशूची दया रूपांतरित होण्याची गरज आहे. त्यांचे कार्य पूर्ण होण्याअगोदर कोणतेच अडथळे येणार नाहीत याची दक्षाता घ्यावी नाहीतर उशीर होईल. -लेटर ५१,१८८६.


सुधारणे बरोबर पुनरुज्जीवनही असणे आवश्यक आहे

पुनरुज्जीवन आणि सुधारणा एकत्रित असणे आवश्यक आहे. पवित्र आत्म्याच्या सहकार्याने हे कार्य करावे. सुधाराणा आणि पुनरुज्जीवन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पुनरुज्जीवन हे नूतनीकरणाचे चिन्ह आहे. आध्यात्मिक जीवनाचे चिन्ह आहे. आध्यात्मिक मरणातून हृदयाचे आणि मनाचे पुनरुत्थान करून त्याला सामर्थ्याने प्रज्वलित करते. सुधारणा हे आपल्या सवयी, विचार, कल्पना आणि वागणे या सर्वांमध्ये बदल होण्याचे चिन्ह ही सुधारणा धार्मिकतेची चांगली फळे आणू शकत नाही. जो पर्यंत आध्यात्मिक पुनरुज्जीवन होत नाही तोपर्यंत धार्मिकतेची फळे येत नाहीत. पुनरुज्जीवन आणि सुधारणा या दोघांनी आपली नेमलेली कामे करायची असतात. ही कामे करीत असताना या दोघांना एक जीव होणे गरजचे आहे. -द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २५ फेब्रुआरी, १९०२



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : १०८