Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वळीव वर्षाव मोठी आरोळी निर्माण करील

With the loud cry of the third angel

त्यावेळी "वळीव वर्षाव" किंवा देवाच्या समक्ष ताजे तवाने होणे हे तिसऱ्या देवदूताच्या मोठ्या आरोळीने होईल. हे सामर्थ्य तो देईल. हे अश्यासाठी कीं देवाच्या संतांनी शेवटच्या सात पिडाच्या काळात खंबीर रहावे म्हणून. -अर्ली रितीनग ८६ (१८५४). 

मी ऐकले की चिलखती पोशाखातील मोठ्या सामर्थ्याने बोलत होते. त्यांचा परिणाम होत होता. मी विचारले हा महान बदल कशामुळे झाला होता. देवदूताने उत्तर दिले की तिसऱ्या देवदूताने दिलेल्या मोठ्या आरोळीमुळे परमेश्वरासमक्ष होणाऱ्या वर्षावाचा परिणाम आहे. -अर्ली राइटिंग्स २७१ (१८५८).

आगोटीचा पाऊस परिवर्तन करील वळीव वर्षाव ख्रिस्तासारखे जीवन करील.
अनुभवाशिवाय कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याचा प्रश्नच येत नाही. मग सुरुवात कशी करणार आणि इतरांना कसे सत्कार्य करणार ? आगोटीच्या पावसाखाली आम्हाला आशीर्वाद मिळाला याची आम्हाला गरज शेवट पर्यंत असेल. आम्ही जसे पवित्र आत्म्यासाठी देवाकडे विनंती करू तसे आपली हृदये दयाळू व नम्र होतील. वळीव वर्षावासाठी आम्ही सावध राहून तयारी करू. -टेस्टिमोनीज टू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्कर्स ५०७,५०९,(१८९७). 

पवित्र आत्मा प्रत्येक अंत:करणात राहण्याची वाट पहात आहे. जे त्याला पाहुणा म्हणून निमंत्रण देतात आणि सन्मानाने त्याचा स्वीकार करतात. त्यांना ख्रिस्ताचा स्वभावगुण पूर्णपणे मिळेल. सुरु झालेले चांगले कार्य संपेल. पवित्र विचार स्वर्गाची आस्था आणि ख्रिस्तासारखी गुणवत्ता अशुध्द विचार, कुटील कारस्थान व सर्व वाईट गुण निघून जातात. -कॅन्सल व द हेल्थ ५६१ (१८९६). 

आपल्याकडे देवाच्या आत्म्याचे परिणाम असू शकते. परंतु प्रार्थना आणि विश्वासाकरवी आपण पवित्र आत्मा अधिक प्रमाणात मिळवू शकतो. आपण कष्ट करून तो मिळवून शकत नाही. आपण जर आपली प्रगती करू शकत नाही तर आगोटीचा आणि वळीव वर्षाव हे दोन्ही मिळू शकणार नाही. यासाठी आपण आपल्या मनाचा कल बदलणे आवश्यक आहे. यासाठी आत्मा बदलावा तेव्हा आपल्यावर मोठ्या जवाबदार्या येऊन पडतील.


मंडळींचे एकत्र होणे, सभेमध्ये, घरामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा इतर कोणत्याही निमित्ताने एकत्र येणे ही देवाने दिलेली संधी आहे. अशावेळी या सर्व आत्म्यांना आगोटीचा आणि वळीव वर्षावासाठी तयार करण्याचे काम करायचे आहे. -टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स. ५०८ (१८९७). 

जेव्हा देवाच्या आत्म्यासाठी तयारी करण्यासाठी मार्ग तयार केल्यास वरून आशीर्वाद येईल. देवाच्या लोकांवर आशीर्वाद आल्यावर सैतान कोणत्याच गोष्टीचा अडथळा आणू शकत नाही. आशिर्वादाचा पाऊस पृथ्वीवर येण्यासाठी आता तो स्वर्गाच्या खिडक्या बंद करू शकणार नाही. -सेलेक्टड मेसेजस १:१२४ (१८८७). 


पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : १०६