Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वळीव वर्षावाचे वचन

The last spiritual rain on earth-वळीव वर्षाव
The Last Spiritual Rain on Earth

प्रेषितांच्यावेळी जो वर्षाव होता तो "आगोटीचा" पाऊस होता आणि त्याचा परिणाम गौरवी होता. परंतु वळीव वर्षाव त्याहून भरपूर असेल. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:२१ (१९०४). 


हंगामाच्या शेवटी मानवपुत्राच्या आगमनासाठी मंडळींची तयारी करण्यासाठी विशेष आध्यात्मिक कृपादानाचे आश्वासन देण्यात आले आहे. या आत्म्यांच्या वर्षावाची तुलना वळवाच्या पावसाच्या वर्षावाशी केली आहे. -थे अक्टस अपोस्टल ५५ (१९११). 


पृथ्वीवर देवाच्या शेवटल्या पीडा येण्यापूर्वी देवाच्या लोकांमध्ये पूर्वीसारखा देवभिरुपणा असा जागृत होईल की जो प्रेषितांच्या काळापासून ते आजवर दिसला नाही. देवाच्या भक्तांवर देवाचा पवित्र आत्मा व त्याचे सामर्थ्य ओतले जाईल. -द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ४६४ (१९११). 


हे कार्य पेंटिकॉस्टच्या म्हणजे पन्नासाव्या दिवसाच्या कार्यासारखे होईल. तेव्हा शुभवर्तमान कार्याची सुरुवात होताना ते मौल्यवान बीज रूजण्यासाठी पवित्र आत्म्याच्या वर्षावाद्वारे जसा "पहिला पाऊस" आगोटीचा पाऊस दिला गेला होता. तसेच शुभवर्तमानाचे कार्य संपताना पीक परिपकव होण्याकरिता "नंतरचा पाऊस" वळवाचा पाऊस दिला जाईल. -द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६११. (१९११). 



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : १०६