
आत्म्याच्या प्रभावाखाली अनुताप व पापकबुली यांचे उदगार पापक्षमेसाठी वदलेल्या स्तुतिस्तोत्रात मिसळले होते. एका दिवसात हजारोंच्या जीवांचे परिवर्तन झाले होते.
पवित्र आत्म्याने...शिष्टांवर केलेल्या दानाच्या वर्षावाचे ते चिन्ह होते. त्याच्या लोकांच्या भाषेत अस्खलितपणे बोलून प्रदेशात त्यांना सत्याची शुभवार्ता सांगता आली नसती. -अक्टस ऑफ द अपोस्टल. ३८, ४०.
त्यांची अंतःकरणे परोपकार बुद्धीने इतकी प्रेरित झाली की ख्रिस्ताच्या सामर्थ्याविषयी जगाच्या कानाकोपर्यात साक्ष देण्यासाठी ते प्रवृत्त झाले. -अक्टस ऑफ अपोस्टल ४६ (१९११).
पन्नासाव्या दिवसाच्या पवित्र आत्म्याच्या वर्षांचा काय परिणाम झाला ? पुनरुत्थित उद्धाराची आनंदाची वार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित झाली. अंतःकरणाचे परिवर्तन झालेले लोक सर्व दिशांनी येऊन मंडळीत सामील झाले. सन्मार्ग सोडून गेलेल्यांचे पुन्हा परिवर्तन झाले... ख्रिस्ताच्या शिलासारखा स्वभाव प्रदर्शित करणे आणि त्याच्या राज्याच्या प्रसारासाठी पराकाष्टा करणे ही भाविकांची महत्वकांक्षा बनली. -एक्ट्स ऑफ अपोस्टल ४८ (१९११).