![]() |
आगोटीचा पाऊस व वळीव वर्षाव |
प्रथम दव आणि पाऊस बीज अंकुरीत होण्यासाठी देण्यात येतो. आणि नंतर पीक पिकविण्यासाठी व कापणी करण्यासाठी पवित्र आत्मा पुढील कार्य करतो. पवित्र आत्म्याचे कार्य प्रथम आवस्ते पासून आध्यात्मिक वाढ होण्या पर्यंत असते. पिकाचे पिकणे व दाणे तयार होणे हे देवाचे कार्याचे प्रतिनिधित्व असते. आत्मे जिंकण्याचे दयेचे कार्य देवाचा आत्मा करीत असतो. या मध्ये आत्म्याचे सामर्थ आहे. देवाचे नीतिमत्ते मुळे मानवीय स्वभाव परिपूर्ण होतो. ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आपले परिपूर्ण परिवर्तन होणे आवश्यक आहे.
वळीव वर्षाव पृथ्वीवरील हंगामातील कापणी हे मंडळीच्या आध्यात्मिकतेच्या तयारीचे दर्शन आहे. म्हणजे येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी ते तयार असतील. परंतु जोपर्यंत आगोटीचा पाऊस पडत नाहीत तो पर्यंत जीवन नाही. पिकाची कोवळी पाने किंवा अंकुर फुटणार नाही. जोपर्यंत प्रथम वर्षाव होत नाही तो पर्यंत वळीव वर्षाव पीक वर आणू शकत नाही. व कापणी ही होऊ शकणार नाही. -टेस्टिमोनीज मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ५०६ (१८९७).