![]() |
प्रेषितांच्या काळात झालेला आत्म्याचा वर्षाव प्रारंभीच्या आगोटीच्या पावसाचा होता |
येशूच्या आज्ञेप्रमाणे त्याचे शिष्य येरुशलेम मध्येच थांबले कारण देवाने वचन दिले होते की त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल. परंतु ते शांत राहणार नाहीत. नोंदणीमध्ये असे सांगितले आहे की " आणि ते मंदिरात देवाचा सतत धन्यवाद करीत राहील" (लुक २४:५३).
शिष्य पूर्ततेची वाट पाहत थाबले होते. वचन पूर्तीसाठी त्यांनी आपली ह्रदये नम्र केली. त्यांनी खऱ्या पश्चातापाने आपल्या अविश्वासूपणाच्या पापांची क्षमायाचना केली. त्यांनी विश्वासाने आणि कळकळीची प्रार्थना केली की बाहेर जाऊन लोकांना येशूविषयी आणि देवाचे वचन सांगावे. यासाठी सर्व मतभेद विसरून ते ख्रिस्ती सहभागामध्ये एकत्र आले, ते देवाच्या अधिक सानिध्यात आले आणि जसजसे त्यांनी हे केले तसतसे त्यांच्या मनाची खात्री झाली की ख्रिस्ताच्या सानिध्यात आल्याचा संधीमुळे हे सर्व घडले. -द एक्ट्स ऑफ द अपोस्टल ३५-३७ (१९११).
सर्व शिष्य एकत्र एक छताखाली आल्यानंतर त्यांच्यामध्ये तू मोठ्या मी मोठा हा भेदभाव राहिला नाही. तशा प्रकारचा आत्मा त्यांच्यामधून निघून गेला आहे. -टेस्टिमोनीज फॉर द ख्रिस्त ८:२० (१९०४)
प्रेषितांच्या काळात झालेला आत्म्याचा वर्षाव प्रारंभीच्या आगोटीच्या पावसाचा होता आणि त्याची परिणती वैभवशाली झाली होती. काळाच्या अखेरपर्यंत पवित्र आत्म्याचे सानिध्य खर्या मंडळींबरोबर असणार आहे. -अक्टस ऑफ अपोस्टल ५४-५५ (१९९१).