चतुर सैतानाचे हस्तक मेलेल्या प्रियजनांचे रूप घेऊन येतील आणि अनेकांना फसवतील. आप्तजन त्याच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. मी आपल्या लोकांना इशारा दिला की आपल्यामधील काही विश्वासू विश्वासाविरुद्ध जाऊन सैतानाच्या फसव्या कृत्याला बळी पडतील व त्याच्यासमोर खोट्या तत्वांचा स्वीकार करतील.
अद्भुत कार्य करणारे आपले स्थान पटकावतील. ते मंत्री, न्यायाधीश, डॉक्टर हे सर्व पुढारी खोटेपणाला आपल्यावर अधिकार गाजविण्याची परवानगी देतील. आपला आत्मा सैतानाला सोपवितील. ते स्वतः फसवे असतीलच. ते स्वतःला त्या फसण्याच्या स्वाधीन करतील. आध्यात्मिक खोटेपणाचा प्याला ते पितील. -द अपवर्ड लूक ३१७ (१९०५).