Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

खरेपणा व खोटेपणातील फरक कसा ओळखावा

Satans deception in the last days
खरेपणा व खोटेपणातील फरक कसा ओळखावा

ख्रिस्ताच्या येण्याच्या पद्धतीची सैतानाला परवानगी नाही. -ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६२५ (१९११). सैतान येशू ख्रिस्ताचे रूप घेऊन येईल आणि मोठे चमत्कार करील आणि लोक त्याला नमन करतील. त्याची पूजा करतील. त्यांना वाटेल की तोच ख्रिस्त आहे. देवाच्या लोकांना आज्ञा करण्यात येईल की जग ज्या ख्रिस्ताची भक्ती करतात त्याची भक्ती करावी. आम्ही काय करावे? त्यांना सांगा की ख्रिस्तानेआपलाल्या ताकीद देऊन सावध केले होते की अश्या प्रकारचा वैरी मानवाचा कट्टर शत्रू आहे. तरीही तो स्वतःला देव समजतो. आणि जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा त्याचे महान सामर्थ्य त्याचे गौरव त्याच्याबरोबर असणारे दहा हजार वेळा, दहा हजार दिव्यदूत असतील व जेव्हा तो येईल आपण त्याची वाणी ओळखू. - द ए एस डी. ए बायबल कॉमेंटरी ६:११०६ (१८८८).


सैतान प्रत्येक संधी मिळवण्याचा झटून प्रयत्न करत आहे. तो स्वतःस प्रकाशाचा दूत असे प्रगट करतो. तो सर्व पृथ्वीभर चमत्कार करीत फिरेल. त्याचे सुंदर वैभवी बोलणे आणि रूप जसा काय प्रत्क्षात येशू ख्रिस्त परंतु हा येशू ख्रिस्त लोकांना देवाच्या नियमांपासून दूर घेऊन जात आहेत. त्याचा धर्म खोटा असेल. तेजस्वी व प्रकाशमान दिसेल परंतु निवडलेल्यांची सुद्धा फसवणूक करील. राजे अधिपती अध्यक्ष प्रधान व जे उच्च पदावर आहेत ते सर्व त्याच्या खोट्या रुपाला बळी पडतील. -फंडामेंटल ऑफ ख्रिश्चन एज्युकेशन ४७१,४७२. (१८९७). 



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : ९४