![]() |
जगाचा इतिहास संपुष्टात येणार |
नंतर मी तिसरा देवदूत पाहिला ( प्रकटी १४:९-११ ) माझ्या सोबतीच्या देवदूताला तो म्हणाला “त्याचे कार्या भीतीदायक आहे. त्याचे मिशन फार मोठे आहे तो देवदूत असा आहे की जो गहू व निदन वेगळे करणारा आहे. आणि त्यावर तो शिक्का मारणारा आहे तो गहू स्वर्गीय कोठारात साठवितो. या गोष्टी नियमानुसार असून पूर्ण मनाने लक्षात ठेवाव्यात.” - अली राययिग्स ११८ (१८५४)
आपल्याला न्यायाधीशासमोर उभे राहून मनाने व बुद्धीने नम्रपणे समरस होणे आहे. आपली निष्ठा आणि विश्वास या विषयी आपणांस जाणून घ्यायचे आहे या गोष्टी तरुणांनी जाणून घ्याव्यात.
जगाचा इतिहास संपुष्टात येणार आहे हे त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. या गोष्टी त्यांच्यासाठी सार्वकालिक कल्याणकारी आहेत याची जाणीव ठेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या गोष्टी कडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१२८,१२९ (१९००)
ज्या काळामध्ये आपण जगत आहोत त्या काळाशी अनुसरून आपण शेवटच्या काळाच्या मुद्यांवर अभ्यास करणे आवश्यक आहे. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीझ ४:१६३ (१८९५)
जे स्वतःला देवाच्या नियंत्रणाखाली ठेवतात. त्यांना देवाचे मार्गदर्शन होते. येणाऱ्या घटनांमध्ये आपण त्याच्या आश्रयाखाली विश्वासाने ठाम राहणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:१४ (१९०२)
आपाल्याला इतिहासातील भविष्याची झालेली पूर्तता पाहायची आहे त्यामध्ये घडलेल्या घटनांचा अभ्यास केल्यास पुढे येण्याऱ्या घटनांची कल्पना येईल. पुढे होणाऱ्या रचनात्मक घटना किंवा शेवटची लढाई ही महान संघर्ष असेल. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:३७७ (१९०४).