Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

भविष्यकाळ ची दूरवर पसरलेली भीती

 

Fear of the Future and Time

सध्याची वेळ प्राणी मात्रासाठी महत्वाची आहे. राजे, राजकारणी, मंत्री आणि जे सर्व उच्च पदावर आहेत विचारवंत बुद्धिमान स्त्रीपुरुष सर्वांचे लक्ष्य आमच्या सभोवती घडणाऱ्या गोष्टींकडे आहे. राष्ट्रांमधील संबंधाचे ते अवलोकन करीत आहेत. पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टींची प्रखरता ते अजमावीत आहेत. त्यांना जाणीव होत आहे की लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार आहे. काहीतरी अघटित प्रसंगाच्या काठावर जग सध्या उभे आहे. - प्रोफेट्स अँड किंग्स ५३७ (१९१४) 

Fear of the Future - jesus coming soon

राज्यांमधील अस्थिर समाजामध्ये गंभीर संकटाची घंटा वाजत आहे. लढाईला केव्हाही तोंड फुटेल. या घटना जवळ येण्याची ही महत्वाची सूचना आहे. दृष्ट कृत्ये करणारे आपल्या उद्देशाला घट्ट धरूनच जोमाने आपले कार्य करीत आहेत. घोर संकटे येण्यासाठी ते एकमेकांना सामर्थ्य देण्याचे काम सतत करीत आहे. सैतानाचे हे हस्तक चांगल्याशी शेवटचा मोठा संघर्ष करण्याची तयारी करीत आहे. लवकरच एक मोठा बदल आपल्या जागामध्ये घडून येणार आहे आणि शेवटच्या घटना गतीने घडतील.- टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:११ (१९०९)


पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : ७