तारणाऱ्याला क्रुसावर चढविण्याअगोदर त्याने शिष्यांना सांगितले होते की त्याला ठार मारतील आणि तिसरे दिवशी पुन्हा कबरेतून जिवंत होऊन बाहेर येईल. देवदूत तेथे हजर होते. त्याचे ते शब्द त्यांच्या मनावर व ह्रदयात ठसविण्याचे कार्य ते करीत होते. (मार्क ८:३१,३२, ९:३१, १०:३२-३४)
परंतु शिष्य रोमिसत्तेच्या जोखडापासून मुक्त होण्याची वाट पाहात होते. आणि यासाठी ज्याच्यावर त्यांची भिस्त होती त्याने असले लज्जास्पद मरण सोसावे हे त्यांना सहन होणार नव्हते. यामुळे ज्या शब्दांची त्यांना गरज होती त्यांना त्याची आठवण राहिली नाही आणि त्यांच्या मनातून निघून गेले आणि जेव्हा प्रत्यक्षात संकट काळ आला तेव्हा त्यांची तयारी नव्हती. येशूच्या मरणाने त्यांच्या आशांचा भंग झाला जसे काय त्यांना या घटने बद्दल आगावू सूचना देऊनही नसल्यासारखे झाले.
ख्रिस्ताच्या शब्दाकरवी शिष्यांसमोर भविष्य जितक्या स्पष्टपणे सांगितले होते तितक्याच स्पष्टपणे भविष्यवाद्यां करवी आपल्यापुढेही स्पष्ट करण्यात आले आहे. आणि तरीही यास त्याची कल्पना अजून ही लाखोजणांना माहित नाही. जणू काय हे सत्य प्रगटच करण्यात आले नाही - द ग्रेट कॉन्टरर्वसी ५९४ (१९११).