Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

देवाचा जगाला शेवटचा संदेश - तीन देवदूतांचा संदेश

God's final message to the world
तीन देवदूतांचा संदेश 

 

शास्त्रभाग : ( प्रकटीकरण- १४:६ ते ११ )

प्रस्तावना :

देवाने पवित्रशास्त्रामध्ये विशिष्ट काळासाठी विशेष संदेश दिले आहेत. त्या काळाची ती गरज होती. तो संदेश त्या पिढ्यांसाठी फार महत्वाचा होता. परमेश्वराने नोहाला संदेश दिला. संदेष्टा एलिया यांस परमेश्वराने संदेश दिला तसेच बाप्तिस्मा करणारा योहान यालापण विशिष्ट संदेश दिला. शेवटच्या काळासाठी सनातन सुवार्तेचे संदेश देवाने तीन देवदूतांच्या द्वारे आपणास दिला आहे. परंतु हा संदेश सांगण्याचे कार्य देवाने देवदूतांना नव्हे तर मनुष्याला सांगण्याचे सोपवले आहे. ( प्रे:क्र- ८:२५ )  ( प्रे:क्र- १०:१ ते ६ )

परमेश्वराने जे तारणाचे कार्य या पृथ्वीवर सुरु केले आहे त्या मध्ये देवदूताचा महत्वाचा सहभाग आहे. मनुष्याच्या तारणाच्या कार्यामध्ये त्यांना आस्था आहे. ( इब्री- १:१० )  

जागतिक संदेश :

हा संदेश मर्यादित नसून तो जागतिक आहे. हे देवदूत अंतराळात उडताना पहिले याचा अर्थ फार वेगाने हा संदेश जगामध्ये पोहचवला जाईल. कारण प्रभू आपले वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल. ( रोम- ९:२८ ) 

सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल तेव्हा शेवट होईल. (मत्तय - २४:१४)

तीन देवदूतांचा संदेश हा देवदूतांनी म्हणजे स्वर्गातील देवाच्या देवदूतांनी सांगायचा नाही तर तो देवाच्या निवडलेल्या मंडळीने सांगायचा आहे.

* आता आपण देवदूत म्हणजे कोण ते पाहू -

१)  देवदूत = प्रभू येशूचे शिष्य 

२)  देवदूत = सुवार्तेची घोषणा करणारे 

३)  देवदूत = संदेश वाहक

४)  देवदूत = मनुष्यप्राणी दैवी प्रेरणा असलेले


प्रश्न  : हे तीन देवदूत अंतराळाच्या मध्यभागी का उडत आहेत ?

याविषयी आपण कधी विचार केला आहे का ? अंतराळाच्या मध्यभागी उड़नारे देवदूत स्वर्गात नाहीत, स्वर्गात सुवार्तेची गरज नाही अंतराळाच्या खाली पृथ्वीवर हा संदेश वेगाने प्रचार करावयाचा आहे. यांचे दर्शक म्हणून हे तीन देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना आपण पाहतो. तसेच देवदूत हे अंतराळामधील अधिकारी आहेत. अंतराळातील अधिकार देवदूतांना दिलेला आहे. (प्रक- ९:११)

प्रकटीकरणातील देवदूत हे पवित्र आत्म्याद्वारे चालविलेले आहेत. 

* आपण यांची वैशिष्ट्ये पाहू :

१)  मोठी वाणी 

२)  स्पष्टता 

३)  निर्भीडपणा

४)  बाबिलोनच्या पद्धतीचा विरोध 

५)  प्रकाश वेग  ( येजकेल- १:१३ , इब्री- १ ते ७ ) गौरव आणि वेग


* देवदूत किती वेगाने उडू शकतात ?

( दानिएल-  ८:१५:१६ ) वाचा 

देवदूतांचा वेग कल्पनेच्या पलीकडे आहे. ते क्षणार्धात एका ठिकाणाहून पृथ्वीच्या कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. प्रकाशवेगाहून अधिक गतीने ते उडू शकतात. 

तीन देवदूतांचा संदेश हा जागतिक आहे. ( प्रक-  १४:६ )

१) राष्ट्र  २) वंश  ३) भाषा  ४) लोक 

(प्रक- १४:६ ते १२)(मत्तय- २८ : १८ ते २०)

हे शास्त्रभाग आपणास समांतर आहे असे दिसून येईल. 

क्रमशः



लेखक : पा. अमित पारधे