![]() |
न्यायाचा दिवस |
देवाने मानवाला येणाऱ्या न्यायाची सतत सूचना दिली आहे. ज्यांचा त्याच्या या संदेशावर विश्वास होता त्याप्रमाणे त्याच्या आज्ञांचे त्यांनी पालन केले. त्यांची न्यायामधून सुटका झाली परंतु ज्यांनी अविश्वास दाखविला आणि त्या आज्ञा मानल्या नाहीत त्यांचा न्याय झाला. नोहाकडे देवाचे वचन आले, "तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल कारण मी पाहिले आहे की या पिढीत माझ्यापुढे नीतिमान आहेस" नोहाने आज्ञापालन केले आणि तो वाचला. लोटाकडे देवाचा संदेश आला की या ठिकाणाहून निघून जा कारण परमेश्वर या शहराचा नाश करणार आहे (उत्पत्ती ७:१, १९:१४)
लोट स्वर्गीय संदेष्ट्यांबरोबर गेला व त्याचा जीव वाचला त्याचप्रमाणे ख्रिस्तानेही शिष्यांनाही सूचना दिली होती की यरुशलेमाचा नाश होणार आहे. जे कोणी नाशाची लक्षणे पाहतील आणि येणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी शहरे सोडतील. ते वाचतील. तेव्हा आता आपल्या ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाची आणि जगावर येणार्या संकटाची सूचना मिळाली आहे. जे कोणी या सूचनांकडे लक्ष देतील ते वाचतील- द डिझायर ऑफ एजेस ६३४ (१८९८) पुस्तक : शेवटच्या दिवसातील घडामोडी लेखक : एलन जी व्हाईट पान नं. : ८ |